Breaking News

कन्हैया कुमारला अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली, 03 - देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैयाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज 20 दिवसांनी कन्हैयाला जामीन मिळाला आहे. 
कन्हैयाला 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिल्ली हायकोर्टाने जामीन दिला आहे. मात्र, पुढील चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य करण्यासही कोर्टाने कन्हैयाला सांगितले आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच 12 फेब्रुवारीला कन्हैय्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैयावर आहे. कन्हैयाला जामीन देण्यास सुरुवातील पोलिसांनी विरोध केला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी कन्हैयाला जमीन अर्ज करण्यास परवानगी दिली. दिल्ली हायकोर्टात कन्हैयाच्या वकिलांनी जेएनयूतील घोषणांच्या कथित व्हिडीओचे फॉरेन्सिक अहवाल सादर केले. यातील दोन व्हिडीओ प्रक्रिया केलेले आढळले. कन्हैयाच्या वकिलांचे म्हणणे ऐकून दिल्ली हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला.