न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांच निधन
वेलिंग्टन, 03 - न्यूझीलंडचे माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो याचे निधन झाले. रक्ताच्या कर्करोगाने वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी या झुंजार क्रिकेटपटूचा बळी घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते.
2012 साली त्याच्यावर केमोथेरपी करण्यात आली आणि त्यानंतर ते पूर्ण बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र सप्टेंबर 2014मध्ये कॅन्सर परतल्याचे त्यांनी स्वतःच जाहीर केले होते. 13 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये मार्टिननं तब्बल 17 कसोटी शतके ठोकलीते. 77 टेस्टमध्ये 5 हजार 444 रन्स त्यांच्या नावावर आहेत. तर 143 वन डे सामने ते खेळलेत. न्यूझीलंड संघाला वेगळी ओळख मिळवून देणारा कर्णधार हरपल्याची खंत क्रिकेट
वर्तुळात व्यक्त होते.