आवटी, बागवान यांना कामकाजास केली मनाई
सांगली, 27 - नगरसेवकपद रद्द ठरवलेल्या सुरेश आवटी व मैन्नुद्दीन बागवान यांना महापालिकेच्या कामकाजात भाग घेण्यास, महासभेला हजर राहण्यास उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांना भत्तेही देऊ नयेत, असेही न्यायालयाने बजावले आहे.
त्यामुळे 31 मार्च रोजी होणार्या महापालिकेच्या अंदापत्रकीय महासभेला या दोघांनाही उपस्थित राहता येणार नाही. तसेच सभापती निवडीवेळी मतदान झाले तर त्यांना मतदानही करता येणार नाही. मिरजेतील विभागीय कार्यालयावर नागरी प्रश्नांसाठी काढलेल्या मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीमुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्या वेळी या दोघांसह मिरजेतील अनेक नेते सहभागी झाले होते. मिरज न्यायालयाने या सर्वांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, जेव्हा निवडणूक झाली तेव्हा या शिक्षेला जिल्हा न्यायालयाची स्थगिती नव्हती. तरीही त्यांना निवडणुकीस पात्र ठरवल्याबद्दल विरोधी उमेदवारांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली.
छाननी प्रक्रियेवेळी प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद नसल्याचे स्पष्ट झाले होते. छाननी प्रक्रियेनंतर दोघांनीही न्यायालयात धाव घेतली होती. महिन्याभरापूर्वी या दोघांना न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने त्यांना त्यासाठी महिन्याभराची मुदतही दिली होती. त्यांचे अपिल दाखल करून त्यावर झालेल्या सुनावणीत दोघांनाही महासभांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे त्यांना महासभेचा अजेंडाही पाठवला जाणार नसल्याचे पालिका
वर्तुळातून सांगण्यात आले.