Breaking News

डासांच्या औषध खरेदीत 35 लाखांचा घोटाळा

सांगली, 05 - सांगली महापालिका क्षेत्रात बोगस औषध फवारणी करण्यात आली असून कागदावर औषध खरेदी करून 50 लाखाचा गोलमाल करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेता दिग्विजय सूर्यवंशी आणि नगरसेविका प्रतिमा मदभाविकर यांनी पत्रकार बैठकीत केला. 
 महापालिकेकडून 1 कोटींचा फंड औषध फवारणीसाठी दिला जातो या अंतर्गत प्रत्येक प्रभागात 25 लाख औषध फवारणीसाठी निधी खर्च केला जातो.मात्र चालू वर्षी कागदावरच औषध खरेदी करून 30 ते 35 लाखाचा घोटाळा आरोग्य विभाग आणि प्रशासनाने केल्याचा आरोपही दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डॉल्फिन सेल्स,श्रीराम ऍग्रो आणि रमेश ऍग्रो यां तीन कंपनीकडूनच औषध खरेदी केली जात आहे.डांस मारण्यासाठी आवश्यक निऑन हे औषध फक्त शासनाकडे मिळत असताना हीच औषधे वरील तीन कंपनीकडून खरेदी केल्याचे दाखवन्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये मोठा गोंधळ आहे,औषह खरेदीचे मस्टर मागूनही माहिती दिली जात नाही,त्यामुळे हि औषधे गेली कुठे ? असा सवालही दिग्विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.