Breaking News

पोष्टाने बदल स्वीकारने गरजेचे ः जिल्हाधिकारी

सांगली, 13 -  सांगली प्रधान डाकघरामध्ये 2012 आय टी मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट अंतर्गत एटीएम सुरु करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते आज सांगली प्रधान डाकघर येथील एटीएम चे उद्घाटन करण्यात आले.
सांगली प्रधान डाकघरामध्ये  82 हजार 440 बचत खाती आहेत. हे सर्व गङ्घाहक एटीएम चा वापर करु शकतात. सांगली विभागामध्ये 2 प्रधान डाकघरे, 80 उप डाकघरे व 336 शाखा डाकघरांचा समावेश आहे. 2012 मध्ये डाक विभागाच्या प्रत्येक सेक्टरमध्ये प्रगती करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तसेच अधिक चांगल्या प्रकारे सेवा पुरविण्यासाठी भारतीय डाक विभागाने आय टी मॉडर्नायझेशन प्रोजेक्टची सुरवात केली. सांगली डाक विभागात एकूण 13 लाख 67 हजार 96 खाती असून त्यामध्ये करोडो रुपयांच्या ठेवी जमा आहेत. आय टी मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट 2012 मध्ये सध्याच्या बचत बँकेचे कोअर बँकिंग प्रणालीमध्ये रुपांतर करणे अंतर्भूत आहे. या प्रणालीमुळे गङ्घाहक भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये बचत बँकेच्या सुविधा घेवू शकतात. आत्तापर्यंत सांगली डाक विभागाच्या 57 पोस्ट ऑफिसमध्ये कोअर बँकिंग प्रणाली उपलब्ध आहे. उर्वरीत सर्वच कार्यालयामध्ये या महिना अखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे 80 हजार गङ्घाहकांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ठेवी ठेवण्याची तसेच काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे. 
दीडशे वर्षाहून अधिक काळापासून भारतीय डाक विभागाने देशाच्या दळणवळणात तसेच सामाजिक, आर्थिक विकासात निर्णायक भूमिका पार पाडली आहे. टपालाची देवाणघेवाण, ठेवी स्वीकारणे, गङ्घामीण तसेच शहरी विभागात टपाल जीवन विम्याचे संरक्षण देणे आणि किरकोळ सेवांमध्ये बिले स्वीकारणे, विविध प्रकारच्या फॉर्म्सचा पुरवठा करणे इत्यादी सुविधा पुरवून टपाल विभागाने जनसामान्यांच्या जीवनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून मनरेगा योजनेंतर्गत मजुरीचे तसेच वृधापकाळ निवृत्ती वेतनाचे वाटप देशातील 1 लाख 55 हजार 15 टपाल कार्यालयातून करण्याचे काम डाक विभाग करत आहे.