Breaking News

जिल्हा पोलिस भरती 98 जागांसाठी 1535 अर्ज

सांगली, 13 -  जिल्हा पोलिस दलात 98 जागांसाठी होणार्‍या भरतीसाठी आजअखेर 1535 उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल केले. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी रात्री दहापर्यंत अंतिम मुदत आहे.जिल्हा पोलिस दलात 98 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. 
त्यामध्ये सर्वसाधारण 28, महिला 30, खेळाडू 5, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 15, अंश पदवीधर 5, पोलिस पाल्य 4, गृहरक्षक 5 याप्रमाणे आरक्षण ठेवले आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 फेब्रुवारीपासून सुरु झाली. इच्छुक उमेदवार स्वतः ऑनलाईन किंवा महा ई सेवा केंद्रावर अर्ज भरु शकतील. स्वतःचा विहित आकारातील फोटो सहीसह स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आत्तापर्यंत 1535 जणांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. 18 फेब्रुवारी रोजी रात्री दहापर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतर स्टेट बँकेत पैसे भरण्याची मुदत 22 फेब्रुवारीपर्यंत आहे. शारीरिक पात्रता पूर्ण करणार्‍या उमेदवारांना शंभर गुणांची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. शंभर गुणांची लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेसाठी एका जागेस पंधरा उमेदवार याप्रमाणे निकष लावला जाईल. लेखी परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी आहे.