Breaking News

विवाहितेची आत्महत्त्या सासरच्या घरापुढे अंत्यसंस्कार

सांगली, 13 -  तालुक्यातील मतकुणकी येथील तेजश्री अविनाश पाटील वय 19 विवाहितेने गुरुवारी 2  पेटवून घेऊन आत्महत्या केली.मात्र सासरच्या लोकांनी जाळल्याचा नातेवाईकांचा आरोप केला.व विवाहितेचा अंत्यसंस्कार सासरच्या दारात करण्याची नातेवाईकांची भूमिका घेतलीे .मात्र तणाव वाढल्याने  मतकुणकी मध्ये दंगल नियंत्रण पथक दाखल करण्यात आले.याप्रकरणी मुलीचे वडील लक्ष्मण आकाराम पाटील यांनी पती अविनाश भिमराव पाटील, सासरा भीमराव धोंडीराम पाटील, सासु सिंधुताई भिमराव पाटील व दिर प्रवीण भिमराव पाटील यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
दिलेल्या फिर्यादित लक्षमण पाटील यानी सांगितले की 6  महिन्यापूर्वी अंजनी येथील आराध्याचा मतकुणकीच्या अविनाश बरोबर विवाह झाला होता.अविनाश हां लष्करात नोकरिस आहे .त्यामुळे तेजश्री ही सासु सासर्‍यांसोबत राहते. दहा दिवसांपूर्वी तिला सासरच्या मंडलीनी माहेरी पाठवले.व परत येताना पायातील सासूला पायातील पटया,कानातील ज़ूबे, व रोख पाच हजारांची मागणी करण्यात आली होती.यानंतर आराध्या सासरी आली असता सासु ,सासरे,व दिर यांनी तुला सांगितलेली रकम व दागिने का आणले नाहीस यावरून त्यांच्यात वाद झाला. आपली परिस्थिति गरीबिची असल्याने ही मागणी आपण पूर्ण करू शकणार नसल्याने गुरुवारी मध्यरात्री आत्महत्या केली. सासरच्या लोकांनीच जाळून मारल्याचा आरोप करात मुलीच्या घरच्यानी आक्रामक पवित्रा घेत शव सासरच्या दारातच अंत्यविधी करण्याची  भूमिका  घेतल्याने तणाव  वाढला.आमदार सुमनताई पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात  पिंगळे  यानी मध्यस्थी करत जमावाला शान्त केले. याचा अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.