Breaking News

अभिव्यक्ती प्रत्येकाकडे असते मात्र ती समोर येत नाही- डॉ. मो.स. गोसावी


नाशिक/प्रतिनिधी। 15 - आपल्यापैकी प्रत्येकात अभिव्यक्ती आहे, मात्र आपण ती समोर आणत नाही, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात डॉ मो स गोसावी यांनी माहितीपटासाठी संहिता लेखन या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर पटकथाकार संजय पवार, प्राचार्य व्ही एन सूर्यवंशी, उपप्राचार्य एस खंडेलवाल,  उपप्राचार्या रूपन सिंग, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. वृन्दा भार्गवे आणि मार्गदर्शक नितीन परांजपे उपस्थित होते. 
याप्रसंगी डॉ मो स गोसावी यांनी बदलत्या काळानुसार आता व्यावसायभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कुशलता मिळवण्याची गरज आहे, प्राविण्याकडे वळायला हवे . सुसंवाद वाढण्याची गरज आहे, या कार्यशाळेने एक आदर्श शिक्षणाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. गोखले सोसायटीने नेहमीच उद्योजकतेकडे शिक्षणाचा प्रवास विद्यार्थ्यांनी करायला हवा, असे वक्तव्य अभ्यासक्रमांविषयी बोलताना गोसावी यांनी केले. 
तत्पूर्वी समारोपाच्या कार्यक्रमात संजय पवार यांनी संवाद लेखन त्यातील संकल्पना ते निर्मित्ती याबद्दल विद्यार्थ्यांना विविध मुद्द्याद्वारे मार्गदर्शन करता आल्याचे नमूद केले. माहितीपटात अर्थार्जन हा मुद्दा स्पष्ट आहेच. मात्र पैसा कमावणे हा माहितीपटाचा उद्देश नसतोच. मालिकालेखन हे कोणीही करू शकते. 
लेखनाचा दर्जा घालवायचा नसेल तर मालिका लेखन करु नये. घरात स्वयंपाक करणारी आई ही मालिका लेखन करु शकते, मालिका फक्त करमणुकीचे साधन आहे, लेखन म्हणून त्याला गांभीर्य नाही असा मार्मिक सल्लादेखील पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी 
प्रास्ताविक प्रा. व्ही एन सूर्यवंशी, सूत्रसंचालन प्रा. रमेश शेजवळ यांनी तर विद्यार्थी प्रतिनिधी सुरेश नखाते यांनी केले.