दहशदवाद्यांचा खात्मा करणार ’मेक इन इंडिया’चे ड्रोनसारखे यंत्र
मुंबई, 15 - राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेर्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.
देशांतर्गत दहशतवादी हल्ला करतात तेव्हा त्याचा मुकाबला करण्यासाठी संरक्षण दल अथवा एनएसजी कमांडोंचा वापर आपण करतो. यात आपले अनेक जवान शहीद होतात. मात्र आता या दहशदवादांचा मुकाबला यंत्राणे केला जाऊ शकतो. तशा प्रकारचे यंत्र संरक्षण दलाने तयार केले आहे. रिमोटने आॅपरेट केले जाणारे हे यंत्र दहशतवादी लपलेल्या इमारतीत जाऊन त्यांच्यावर गोळीबार करू शकते. यात कॅमेराही बसवण्यात आल्यामुळे समोरील दृश्य
बघून हे यंत्र आपल्याला कंट्रोल करता येते.