मेक इन इंडिया कार्यक्रमावेळी भीषण आग; आग आटोक्यात
मुंबई, 15 - मुंबईमध्ये सध्या मेक इन इंडिया वीक सुरु आहे. याचाच भाग असलेल्या महाराष्ट्र रजनी कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या स्टेजला आग लागली.
ही आग आटोक्यात आणण्यात मुंबईच्या अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अग्नीशमन दल एक ते दोन दिवसांमध्ये याची चौकशी करुन अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहे.मेक इन इंडियाचा भाग असलेल्या महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सुरु होता. यावेळी मराठी अभिनेत्री पूजा सावंत स्टेजवर लावणी सादर करत होती. ही लावणी सादर करत असतानाच ही आग लागली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिग्गज उपस्थित होते.