Breaking News

चांडक-बिटको-चांडक महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

नाशिकरोड/प्रतिनिधी। 13 - गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील चांडक - बिटको महाविद्यालयात नुकताच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. मो.स.गोसावी होते. 
प्रमुख पाहुणे म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विभागीय सचिव प्राचार्या डॉ. दिप्ती देशपांडे, देवळाली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश घोलप, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, जनरल सेक्रेटरी रोहन जाधव,प्रा. डॉ. एस.जी.देवधर, प्रा. जयंत भाभे, सुप्रसिध्द दिग्दर्शक व अभिनेते मुकुंदराव, प्रा. डॉ. डी.जी.बेलगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.  प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. यावेळी डॉ. मो.स.गोसावी यांनी पीएच.डी प्राप्त डॉ. सुनिल जोशी, डॉ. महेश औटी, डाॅ. शशिकांत साबळे यांसह प्रा. डॉ. राम कुलकर्णी यांचा सत्कार केला. त्यानंतर प्रा. डॉ. एस.जी.देवधर (विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष), उपप्राचार्य प्रा. 
आर.बी.कुलकर्णी व जनरल सेक्रेटरी रोहन जाधव यांनी अहवाल वाचन केले.मान्यवरांच्या हस्ते कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण तसेच एन.एस.एस., एन.सी.सी. कॅडेटस्, वार्षिक स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक व कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात आले. यात आदर्श शिक्षक पुरस्कार पुढीलप्रमाणे-कनिष्ठ महाविद्यालय - प्रा. कल्पना सुराणा, प्रा. आदिती तोष्णीवाल, वरिष्ठ महाविद्यालय - प्रा. एस.एस.खेमनार, प्रा. रोहित पगारे, आदर्श कर्मचारी - सौ. वंदना कुलकर्णी, श्रीमती सुवर्णा ईगोले, सदाशिव कांगणे, आर.एस गोडसे, प्राचार्य ह.मा.रायरीकर पुरस्कार - प्रा. एन.यु.पाटील, प्रा. वाय.आर.महाजन, चंद्रकांत महामिने, स्वामी गायकवाड, डॉ. यशवंत राठी उत्कृष्ठ विद्यार्थी पुरस्कार - केदार बिवलकरकार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपप्राचार्य डॉ्र. दिलीप बेलगांवकर तर आभार प्रदर्शन प्रा. जयंत भाभे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. संजय परमसागर यांनी 
पसायदानाने केली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर.बी.कुलकर्णी, प्रा. सुरेंद्र घाटपांडे तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.