Breaking News

परवान्यांसाठी सुधारीत शुल्क

नाशिक/प्रतिनिधी। 13 -  महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे नियम 75 (1)(अ) मध्ये सुधारणा करुन विविध परवान्यांसाठी सुधारित शुल्क लागू होणार आहेत.   मीटर बसविलेल्या मोटार कॅबसाठी परवाना देणे किँवा परवान्याचे नवीकरण किँवा प्रतिस्वाक्षरी, मीटर न बसविलेल्या मोटार कॅबसाठी परवाना देणे किँवा परवान्याचे नवीकरण किँवा प्रतिस्वाक्षरी, मॅक्सी कॅबसाठी परवाना देणे किँवा परवान्याचे नवीनीकरण किँवा प्रतिस्वाक्षरी, वरील वाहनांखेरीज करारावरील वाहनांसाठी परवाना देणे किँवा परवान्याचे नवीनीकरण किँवा प्रतिस्वाक्षरी, टप्पा वाहनांसाठी परवाना देणे किँवा परवान्याचे नवीनीकरण किँवा प्रतिस्वाक्षरी, माल वाहतुक वाहनांसाठी परवाना देणे किँवा परवान्याचे नवीनीकरण किँवा प्रतिस्वाक्षरी, खाजगी सेवा वाहनांसाठी परवाना देणे किँवा परवान्याचे नवीनीकरण किँवा प्रतिस्वाक्षरी, तात्पुरता परवाना देणे किँवा प्रतिस्वाक्षरी अर्जासाठी प्रतयेक कॅलेंडर महिन्यासाठी किँवा त्याच्या भागासाठी प्रतिवाहन, टप्पा वाहतूक, माल वाहतूक, कँत्राटी परवान्यावरील वाहन बदली करण्यासाठी प्रत्येकी 1 हजार रुपये सुधारीत शुल्क आकारण्यात येणार आहे. 
पर्यटक कॅबसाठी परवाना देणे किँवा परवान्यांचे नवीनीकरण आणि राष्ट्रीय परवाना देणे किँवा त्यांचे नवीनीकरण करण्यासाठी प्रत्येक 2 हजार रुपये सुधारीत शुल्क तसेच पर्यटक कॅब व्यतिरिक्त अन्य पर्यटन वाहनांसाठी परवाना देणे किँवा परवान्याचे नवीनीकरण, अंतिम तारखेनंतर परवान्याचे नुतनीकरण करण्यास 
उशीर झाल्यास अशा अर्जासाठी प्रत्येक कॅलेंडर महिन्यासाठी किँवा त्याच्या भागासाठी प्रतिवाहन 5 हजार रुपये सुधारीत शुल्क आकारण्यात येणार आहे. नियम 75 (1)(अ) मध्ये नमूद केलेल्या शुल्काव्यतिरिक्त ऑटोरिक्षा परवाना जारी करण्याच्या बाबतीत मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी 15 हजार रुपये व मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी रुपये           10 हजार शुल्क आकारण्यात येईल.  टॅक्सी परवाना जारी करण्याच्या बाबतीत, मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी 15 हजार रुपये व मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी 10 हजार रुपये अतिरिक्त परवाना शुल्क आकारण्यात व वसूल करण्यात येईल. नवीन टॅक्सी परवाना जारी करण्याच्या बाबतीत मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी पंचवीस हजार रुपये व मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी 20 हजार रुपये परवाना शुल्क आकारण्यावतील येईल. 
याबाबत काही हरकती किँवा सूचना असल्यास अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) महाराष्ट्र शासन, दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई 400032 यांच्याकडे कळवावे.