लग्नसराईमुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ
नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही आठवड्यांपासून वाढ दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी तसेच लग्नसराईचा मोसम सुरु असल्याने वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतींने गेल्या नऊ आठवड्यातील उच्चांकी स्तर गाठला.
सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी 27 हजार 700 रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजार, कच्च्या तेलांच्या किंमतीत सातत्याने होत असलेली घसरण आणि डाॅलरचा कमकुवतपणै यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.