पोलिसांचा ’स्पा’वर छापा, 7 महिला ताब्यात
मुंबई, 08 - चेंबुरमधील तंत्र थाई स्पावर रात्री पोलिसांनी छापा टाकून 7 महिलांना ताब्यात घेतले. यात 6 विदेशी महिलांचा समावेश आहे.
या विदेशी महिलांना स्पामध्ये काम करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेतले जात होते. येथील हायप्रोफाईल परिसरात स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून तंत्र थाई स्पावर छापा घातला. पोलिसांनी स्पाच्या मॅनेजर आणि दलाला अटक केली तर ताब्यात घेतलेल्या महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली.