Breaking News

पोलीस पाटील महिला आरक्षण सोडत सोमवारी

नाशिक/प्रतिनिधी। 13 -  निफाड आणि सिन्नर तालुक्यासाठी 111 रिक्त पोलिस पाटील पदापैकी 33 पदे महिला आरक्षण म्हणून राखीव ठेवण्यात आली असून प्रवर्गनिहाय आणि त्यातील 30 टक्के महिला आरक्षण सोडत कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 11.30 वा. निफाड कृषी उत्पन्न उप बाजार परिसरातील  शेतकरी भवन येथे ठेवण्यात आली आहे.
 जिल्ह्यातील पोलीस पाटीलांचे पदे भरण्याबाबतच्या कार्यवाहीला 2013 मध्ये स्थगिती देण्यात आली होती. गृहविभागाच्या सूचनेनुसार पोलिस पाटील भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. बिंदु नामावलीनुसार उपविभागासाठी आरक्षण ठरवांना अनुसुचित जाती-12, अनुसुचित जमाती 22, विजा-अ-05, भज-ब-01, भज-क-07, वि.मा.प्र.05, खुले 59 असे एकूण 111 पदांसाठी आरक्षण निश्‍चित करण्यात आले असून त्यापैकी 33 टक्के पदे महिलासाठी राखीव ठेवण्यात येत आहे. आरक्षण निश्‍चितीच्या प्रक्रियेवेळी सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे. सोडत कार्यक्रमाच्या सुरूवातीस कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात येईल,  असे उपविभागीय दंडाधिकारी निफाड भाग निफाड यांनी कळविले आहे.