Breaking News

क्लेरा बु्रसप्रकरणी नव्याने दुसरा गुन्हा दाखल

 अहमदनगर । प्रतिनिधी । 13 -  क्लेराबु्रस हायस्कुलच्या मैदानावर जागेच्या वादातून बुधवारी दुपारी दीडशे ते दोनशे जणांच्या जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती.
 याप्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल करुन तेरा जणांना अटक करण्यात आली होती. याच घटनेच्या पार्श्‍वभुमीवर मैदानावरील साहित्याची जाळपोळ व नुकसान केल्याच्या आरोपावरुन कन्टंक्शन कंपनीचा सुपरवाझर अक्षय विधाते याने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 14 जणांवर भादवि. 143, 147, 148, 149, 435, 427, बी.बी,ए.अ‍ॅक्ट 37 (1) (3) 135 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. 
दोन्ही घटनांच्या पार्श्‍वभुमीवर आरोपींना अटक करण्याच्या हेतुने उपअधिक्षक बजरंग बनसोडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास मैदान परिसरात पोलिसांचे संचलन व कोंबिंग ऑपरेशन सुरु केले. मैदानावर 20 ते 25 महिला पोलिसांसह शंभर कर्मचार्‍यांचा ताफा उभा असल्याने अनेकांमध्ये याप्रकाराची चर्चा सुरु होती. दोन्ही घटनेतील आरोपी शहराबाहेर फरार झाले आहेत. पोलिसांंनी बुधवारी झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेच बघितले. त्यावरुन आरोपींना पकडण्यासाठी कोबिंग ऑपरेशन सुरु केले आहे. अक्षय विधाते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, चंद्रकांत उजागरे, मार्तीग पारधे, डॉनियल काळोखे, मोजेस पारधे, संजय पारधे, जॉन काळोखे, अनिल काळे, अजित सुर्यवंशी यांच्यासह 29 व इतर अनोळखी 25 जणांनी कंन्ट्रक्शन कंपनीचे काम सुरु असतांना गैरकायद्याची मंडळी जमवून लाकडी दांडके घेऊन काम करणार्‍या मंजुरांना धमकावून सुरक्षा रक्षकांना जखमी केले. कन्ट्रक्शन कंपनीच्या साहित्याची जाळपोळ करुन नुकसान केले. यामध्ये सुधाकर सोमत चव्हाण, सोमनाथ दिलीप वैरागर, व शेख हे तिघे जखमी झाले आहेत. पुढील तपास सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. 
सदर जागा ही मराठी मिशनची असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान, या जागेचा व्यवहार शरद मुथा यांच्याशी झाल्याचे सांगण्यात येते यावरुन सदर जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे.