अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पुणे, 15 - लोणावळ्याजवळील सिंहगड कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणार्या विद्यार्थ्याने होस्टेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी व्हॅलेंटाईन डेच्या रात्री हा आत्महत्येचा प्रकार घडल्याने त्यामागे काही प्रेम प्रकरण तर नाही ना, याचा तपास पोलिस करत आहेत. रोहित जाधव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगावजवळील कौलतेगाव येथील आहे. त्याने काॅलेजमधील सिंधुदुर्ग हॉस्टेलच्या रुम नंबर 3 मध्ये रात्री 10.40 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस पुढील तपास करत आहेत.