टोरँटोमध्ये दीपिका आणि रणवीरचा व्हॅलेंटाईन !
दीपिका पादुकोणच्या प्रेमात आकंठ बुडालेला रणवीर सिंग तिला भेटण्यासाठी टोरँटोमध्ये दाखल झाला आहे. दीपिका आणि रणवीर एकत्र व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत.
‘ट्रिपल एक्स-द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ या चित्रपटातून दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याचे शूटींग सुरू झाले असून विन डिजेलसोबत काम करण्याचे तिचे स्वप्नही पूर्ण होत आहे. तिच्या भेटीसाठी आतूर झालेल्या रणवीरने अखेर टोरँटो गाठले आहे. रणवीरच्या टोरांटोमधील फॅन्सने त्याचे टोरँटोत स्वागत केले आहे. त्याच्यासोबतचा एक सेल्फीही त्याने पोस्ट केला आहे.