काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी : अमित शहा
नवी दिल्ली, 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केंद्रात मिळविलेला विजय सहन होत नसल्यामुळे काँग्रेस पक्षाने आता राष्ट्रद्रोही घटकांनाही पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याची टीका शहा यांनी केली. शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी. देशातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था फुटीरतावादी आणि राष्ट्रद्रोही कृत्यांचा अड्डा होत असताना केंद्र सरकारने शांत रहावे, अशी राहुल यांची अपेक्षा आहे काय, अशी विचारणा शहा यांनी आपल्या ब्लॉगमधून केली आहे.
राहुल यांनी सद्यस्थितीमधील भारताची तुलना हिटलरकालीन जर्मनीशी केली आहे. मात्र भारतामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात पुकारण्यात आलेली आणीबाणीकालीन परिस्थिती ही हिटलरकालीन जर्मनीमधील परिस्थितीशी मिळतीजुळती होती. हिटलरसदृश हुकूमशाहीची मानसिकता ही काँग्रेसच्याच डीएनएमध्ये आहे. अफझल गुरुला सहानुभुती दर्शविणार्यांना पाठिंबा देऊन राहुल कोणत्या स्वरुपाच्या देशभक्तीचे प्रदर्शन करत आहेत ? राहुल यांनी देशाची माफी मागावयास हवी, असे शहा यांनी म्हटले आहे.