Breaking News

विदर्भ युवक विकास संस्थेत प्राध्यापकांना पी.एच.डी.

  बुलडाणा   । 15 -  स्थानिक विदर्भ युवक विकास संस्थेत दि 10 फेब्रुवारी 2016 रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. सत्कार समारंभाचे अध्यक्ष मा.डॉ.संतोष आंबेकर सचिव वि.यु.वि.संस्था, बुलढाणा तर प्रमुख उपस्थिती मा.सौ.मिनल आंबेकर प्राचार्या महात्मा गांधी अध्यापक महा.बुलढाणा, प्राचार्य देवेंन्द्र खारोडे व्यासपिठावर उपस्थित होते. निमित्त संस्थेचे वि.यु.वि.सं.चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बुलडाणा येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले प्रा.संजय आराख व प्रा.बाबाराव सांगळे यांनी शारीरिक शास्त्रातील आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.संतोष आंबेकर व सौ.मिनल आंबेकर यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. 
डॉ.बाबाराव यांचा संशोधनाचा विषय “जलतरण पटु, सकाळी फिरणारे व्यक्ती व अक्रियाशिल व्यक्ती यांचा आरोग्य दर्जा व शरीर क्रियात्मक घटकांचे तुलनात्मक अध्यायन’’ डॉ.एस.एन.बहरा (शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख अमरावती विद्यापीठ) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पुर्ण केले.