विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सोमवारी सांगली जिल्हा दौर्यावर
सांगली, 15 - महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे सोमवार,15 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, 15 रोजी पहाटे 4.33 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने ताकारी रेल्वे स्टेशन, जि. सांगली येथे आगमन व मोटारीने राजारामबापू सहकारी साखर कारखाना, इस्लामपूरकडे प्रयाण.
पहाटे 4.50 वाजता राजारामबापू सहकारी साखर कारखाना, इस्लामपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.20 वाजता मोटारीने राजारामबापू पाटील सह. दूध संघ मर्यादित, इस्लामपूरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता आगमन व राजारामबापू पाटील सह. दूध संघास भेट, स्थळ - इस्लामपूर. दुपारी 12 वाजता मोटारीने इस्लामपूर येथून आष्टा, ता. वाळवाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता आगमन व राखीव, स्थळ - आष्टा. दुपारी 1.30 वाजता संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या नवीन पाच इमारतींचा उद्घाटन समारंभ, स्थळ - आष्टा. सायंकाळी 4 वाजता मोटारीने आष्टा येथून वेंगुर्ला, जि. सिंधुदूर्गकडे प्रयाण.