स्त्री मनात आदरभाव,स्नेह, आपुलकी आणि संस्काराची जपवणूक व्हावी
अहमदनगर । प्रतिनिधी । 15 - सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्य करीत असलेले शिववरद प्रतिष्ठान चांगले काम करीत आहे. प्रतिष्ठानने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजजागृतीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिलांचा एकमेकांत संवाद व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू व वाण वाटप समारंभ आयोजित केला.
स्त्री मनात आदरभाव, स्नेह, आपुलकी आणि संस्काराची जपवणूक व्हावी, यासाठी अशा कार्यक्रमांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन सौ. आशा किशोर डागवाले यांनी केले. शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने हळदी-कुंकू व वाणवाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आशाताई किशोर डागवाले, सविता डागवाले, भार्गवी डागवाले, प्रांजली डागवाले, अनुजा डागवाले, सोनाली डागवाले, रिकिता गवळी, शिल्पा गवळी, नयना जगधने, संगीता लेंडकर, मंगल गाडळकर, प्रतिभा धाडगे, शकुंतला गव्हाणे, सीमा लेंडकर, हेमा लेंडकर,मंदाताई जाधव, गणगले, भरेकर, शिंदे, चवंडके, डफळ, आव्हाड आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.