शिवप्रहारच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन
अहमदनगर । प्रतिनिधी । 15 - शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरात मागील 10 वर्षांपासून भव्य स्वरूपात तीन दिवसीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. हे शिवजयंती उत्सवाचे 11वे वर्ष आहे. यावर्षीही दि.17 ते 19 फेब्रुवारी 2016,सायं.6 ते 10 वा. या कालावधीत भिस्तबाग चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मार्ग (पाईप लाईन रोड ) सावेडी येथे छत्रपती शिवराय व महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
बुधवार दि.17 फेब्रु. रोजी सायं.6 वा पालकमंत्री प्रा राम शिंदे यांचे हस्ते व आ.शिवाजी कर्डीले, जि.प अध्यक्षा मंजुषाताई गुंड, प्रा शशिकांत गाडे, शंकरराव घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार लोककवी प्रशांत मोरे यांचा आई एक महाकाव्य हा नावाजलेला कार्यक्रम सादर होणार आहे.
उत्सवाच्या दुसर्या दिवशी गुरूवार दि.18 फेब्रु.ला शाहीर राजेंद्र खुडूसकर यांचा लोकगिते, स्फूर्तिगीतेहा नाविन्यपूर्ण कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी आमदार अरूणकाका जगताप, आमदार राहुल जगताप,मा.आ.दादाभाऊ कळमकर, मा.आ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले,मा जि.प उपाध्यक्ष सुजीत झावरे, मराठा विद्या प्रसारकचे अध्यक्ष माधवराव मुळे,आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. शुक्रवार दि.19 फेब्रुवारी, शिवजयंती दिनी स.8 वा अहमदनगर शहरातील जुने बसस्थानक येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम व स.9 वा अहमदनगर शहरातून विविध संस्था, संघटनांच्या सहभागातून एकत्रित भव्य शोभायात्रा संपन्न होईल.19 फेब्रु.ला सायं.6 वा तीन दिवसीय शिवजयंती उत्सवाच्या अखेरच्या दिवशी गरजे शिवरायांची तलवार या विषयावर प्रख्यात वक्ते, विचारवंत व साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे घणाघाती व्याख्यान होणार आहे. यावेळी आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, नगरचे उपविभागीय अधिकारी मा.वामन कदम,जि.प चे मा.अॅड.रामनाथ वाघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश प्रवक्ते प्रा सीताराम काकडे,वैभव कदम, प्रवीण गवळी,वाबळे,आदी परिश्रम घेत आहेत.