पोलीस मित्र संघाकडून नोंदणीचे आवाहन
पुणे, 09 - कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस खात्यातील कर्मचारी यांच्या समवेत सामान्य जनतेचा सहभाग असावा, या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मित्र संघात सहभागासाठी नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस मित्र संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना एकत्रित करून पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद साधणे. तसेच समाजातील गुन्हेगारी व दहशतवादी अतिरेकी कारवाया करणार्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींना शोधून समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करणे हा पोलीस मित्र या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे. पोलीस मित्र संघात नाव नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस मित्र संघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता व सहसचिव दीपक मोढवे- पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी जय गणेश व्हिजन, आँफीस नं. 106, अ विभाग, पहिला मजला, आकुर्डी, पुणे येथे अर्ज भरून नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी पोलिस मित्र संघ पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संताजी मुळीक (7507775794) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.