Breaking News

दासनवमीनिमित्त सज्जनगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन

सातारा, 13 - श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्या असलेल्या सातारा तालुक्यातील  सज्जनगडावर समर्थ सेवा मंडळातर्फे समर्थांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात दासनवमी महोत्सव 23 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होत आहे. येथील भक्त निवासात दहा दिवस विविध मान्यवरांची कीर्तने, प्रवचन व गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
महोत्सव काळात दररोज सकाळी सात ते 11 यावेळेत योगेश बुवा रामदासी व रसिकाताई ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दासबोध वाचन, 23 ते 24 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 12 यावेळेत डॉ. अजित कुलकर्णी व 25 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यत गुरुनाथ महाराज कोटणीस यांची प्रवचने होतील. दररोज दुपारी 4 ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मकरंदबुवा रामदासी यांची कीर्तन होईल, तर 23 फेबु्रवारीपासून दररोज सायंकाळी 7 वाजता सम्राज्ञी शेलार व संदीप रानडे, पंडित रघुनंदन पणशीकर, कलापिनी कोमकली, धनंजय हेगडे व सायली तळवलकर, पंडित गणपती भट, देवकी पंडित, पंडित जयतीर्थ मेबुंडी यांचे गायन होईल, तर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता पंडित शौनक अभिषेकी यांचे तर महोत्सवाच्या सांगतेला मंजूषा पाटील यांचे गायन होईल.
दासनवमी महोत्सवाची सांगता 3 मार्चला सकाळी दासभोध वाचन, कीर्तन व महाप्रसादाने होईल. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी केले आहे.