Breaking News

जलयुक्त अंतर्गतची कामे 31 मार्चपूर्वी संपवा : मुद्गल

सातारा, 13 - जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत जिल्ह्यात सुरु असणारी कामे 31 मार्च पूर्वी पूर्ण करा. त्याचबरोबर त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून कामांचे मूल्यमापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी दिल्या. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरु असणार्‍या कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी मुद्गल यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जीतेंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी उपस्थित होते. 
सर्व कामांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी मुद्गल म्हणाले, 23/12/2015 च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची तातडीने सुरुवात करा. सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण झाली पाहिजेत याची काळजी घ्या. त्याचबरोबर त्रयस्थ यंत्रणेमार्फत या कामांचे मूल्यमापन करा. सन 2016-17 मधील 210 गावांचा अराखडा करतांना प्राधान्यक्रमाची तीन कामे अशी सुचवावी की, त्यामुळे गावातील जनावरांच्या, शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न 50 टक्के मिटेल. जिल्हा परिषदेने विंधन विहिर दुरुस्ती सुरु ठेवावी. त्याचबरोबर विहिरीतील गाळ काढुन त्याची दुरुस्ती गतीने करावी. वन विभागाने कामे सुरु ठेवावीत, असेही ते म्हणाले.