Breaking News

जिल्ह्यामध्ये दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

औरंगाबाद, 15 - जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. सिरजगाव (ता. गंगापूर) येथील शेतकरी विठ्ठल किसन शिरसाठ (वय 50) यांनी शेतातील झाडाला गफळास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. 14) मध्यरात्री ही घटना घडली. 
नापिकीमुळे आर्थिक चणचणीला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. निल्लोड (ता. सिल्लोड) येथील शेतकरी दादाराव कडूबा गोरे (वय 55) यांनी शुक्रवारी रात्री शेतात विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली.