Breaking News

प्रांजली व सुकन्या इंगळे यांचा सत्कार

  बुलडाणा   । 14 - अमरावती विभागातून घेण्यात आलेल्या स्वच्छ भारत स्वस्थ भारत या निबंध स्पर्धेत भारत विद्यालयातील सहावीची विद्यार्थीनी प्रांजली इंगळे हिने अ गटात जिल्ह्यातून प्रथम तर दहावीची विद्यार्थीनी सुकन्या इंगळे हिने ‘ब’ गटात जिल्ह्यातील व्दितीय क्रमांक पटकविला आहे. या यशाबद्दल त्यांचे काल 11 फेब्रुवारी रोजी अकोला येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख बक्षीस व प्रमाणपत्र असे होते.
अकोला जिल्ह्याचे पालक मत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या पुढाकाराने अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात शालेय स्तरावर स्वच्छ भारत स्वस्थ भारत या विषयावर सप्टेंबर महिन्यात निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातून पंचवीस हजार विद्याथ्यर्ांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये भारत विद्यालयाच्या दोनशे एक विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली.
 त्यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी अ गट, तर इयत्ता नववी ते बारावी ब गट व खुला क गट ठेवण्यात आला होता. या स्पर्धेत अ गटातून भारत विद्यालयातील सहावीची विद्यार्थीनी प्रांजली सुरेश इंगळे हिने जिल्ह्यातून प्रथम तर दहावीची विद्यार्थीनी सुकन्या सुखनंदन इंगळे हिने जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक पटकिावला आहे. दरम्यान काल 11 फेा्रुवारी रोजी अकोला येथील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर भुमिपूजन व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांजली इंगळे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर आमदार गोपिकिसन बाजोरीया यांच्या हस्ते सुकन्या इंगळे हिचा प्रमाण देवून सत्कार करण्यात आला.