Breaking News

स्वच्छता अभियान स्थगीतीच्या निषेधार्थ चिखलीत कॉगे्रसचे निवेदन

  बुलडाणा   । 14 - राज्य शासनाने आघाडी शासनाच्या काळात सुरू केलेले संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्थग़़़़़ीत करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त चिखली तालुका व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे. आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले की, माजी मंत्री दिवंगत आर.आर.पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व माजी मुख्यमंत्री मा. चव्हाण साहेब यांच्या पुढाकाराने राज्यतील ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्व विशद करणार्‍या या आघाडी शासनाने सुरू केलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्थगीत करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाचा आम्ही तालुका कॉगे्रस कमिटी व शहर कॉ.कमिटीच्या वतीने जाहीर 
निषेध व्यक्त करतो. 
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला संपुर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याचे प्रभावी परिणामही राज्यभर दिसून आला. सदर स्वच्छता अभियानामुळे गावागावात एकोप्याचे वातावरण तयार होवून ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेचे महत्व समजायला लागले होते. त्यातच राज्य सरकारने सदर योजनेला स्थगीती देणे हा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे सदर स्थगीती त्वरीत उठवावी व सदर अभियान हे पुर्वरत राबवावे तसेच आघाडी शासनाने सुरू केलेल्या लोकाभीमुख योजना सुडबुध्दीने बंद करणे हे या शासनाचे अतिशय चुकीचे धोरण दिसून येत आहे.  
त्यामुळे सदर निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत शासनाने सदर स्थगीती त्वरीत उठवावी अन्यथा कॉगे्रस कमिटीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला असून सदर निवेदनावर तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, शहर अध्यक्ष प्रदिप पचेरवाल, युवक कॉगे्रस अध्यक्ष रमेश सुरडकर, प्रसिध्दी प्रमुख किशोर कदम, माजी न.प.उपाध्यक्ष आसिफभाई, कुणाल बोंद्रे, नंदुभाउ सवडतकर, नगरसेवक सुनिलकुमार सुरडकर, कुणाल बोंद्रे, डॉ. इसरार, अ‍ॅड. विलास नन्हई, बाळु सावजी, जक्काभाई, राजु रज्जाक, राजेश मघाडे, गणेश कांबळे, गणेश कांबळे, विठल 
डोके, हनुमान गवते, गजानन सुरूशे, शेख गयाज, डिगांबर देशमाने, बाळु महाजन, गजानन घनघाव, गोंविद येवले, बाळु सुरूशे, गजानन दराडे, साहेबराव आंभोरे, सुनिल सुरूशे, साहेबराव पाटील, विजय सोनलवा, गजानन घायाळ, रूपेश चिंचोले, सुभाष पाटील, जी.जी. येवले, राजु सावंत, पिंटु गायकवाड, संजय गिरी, कैलास सुरडकर, लिबांजी सवडे, गोविंद येवले, संजय सोळंकी, शेख आयाज, यांच्या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.