Breaking News

राज्यस्तरीय मित्र वक्तृत्व स्पर्धेत रेणुका पटवर्धन राज्यात प्रथम

सांगली, 10 - राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मित्र करंडक स्पर्धा 2015-16 मध्ये सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रेणुका पटवर्धन हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ही माहिती जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रवीकांत आडसूळ यांनी दिली. 
यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उपसचिव श्री. कुदळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे व औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुङ्घय कार्यकारी अधिकारी श्री. जोशी, राज्य समन्वयक कुमार खेडकर व चंद्रकांत कचरे आदि उपस्थित होते. 
राज्यातील 34 जिल्ह्यातून दोन्ही महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक पटकवलेल्या स्पर्धकांमधून ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. या स्पर्धकांमधून कु. रेणुका पटवर्धन हिने ङ्गतरुणाईची शपथ स्वच्छ भारत सुंदर भारतच्या पाणी स्वच्छतेबाबतच्या विषयावर आपले विचार प्रकट करुन राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक पटकाविले. 51 हजार रुपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून तिला गौरविण्यात आले. तसेच, कन्या महाविद्यालय मिरजच्या कु. सबिना मुजावर हिला उत्तेजनार्थ 11 हजार रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. या दोन्ही विजेत्यांना राज्याचे युवा स्वच्छतादूत म्हणून संबोधण्यात येणार आहे. या विजेत्यांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रवीकांत आडसूळ यांनी अभिनंदन केले.