Breaking News

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 10 - दुष्काळाची दाहकता व सततची नापीकी, कर्ज आणि दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येत होणारी वाढ याबाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि.9 फेब्रुवारी 2016 रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 
यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, राज्यशासनाने शेतकर्‍यांना जी आर्थीक मदत जाहिर केली. ती अतिशय तोकडी असुन त्यातुन कपाशीच्या पिकाला वगळण्यात आले आहे. याचा निषेध यावेळी करण्यात आला. 
शेतीपिके, फळ पिके आणि वार्षीक लागवडीची पिके, कोरडवाहू क्षेत्रासाठी जाहिर करण्यात आलेली हेक्टरी 6 हजार 800 रुपये मदत अतिशय कमी असल्याने ती वाढव्ाुन 15 हजार रुपये करण्यात यावी, जलसिंचन क्षेत्राकरीता हेक्टरी मदत 13 हजार रुपये ही तोकडी असल्याने 25 हजार रुपये करण्यात यावी, बहुवार्षीक पिकांना देण्यात येणारी मदत हेक्टरी 35 हजार रुपयांपर्यंत वाढवावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करण्यात याव्या, शेतातील कामे, रोजगारहमी अंतर्गत करावे,  60 वर्षावरील शेतकर्‍यांना दर महा  1 हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, शेतीसाठी बिनव्याजी पथ पुरवठा करण्यात यावा, जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ठिबक व तुषारची थकीत अनुदान 87 कोटी रुपये त्वरित देण्यात यावे, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा आणि चार्‍याचा डेपो तात्काळ सुरु करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, जि.प.उपाध्यक्ष पांडूरंगदादा पाटील, बुलडाणा तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने, सभापती आशाताई झोरे, जि.प.सदस्य नरेश शेळके, दत्ता काकस, सुमित सरदार, रेखाताई सावजी, दिालीपसींग राजपूत, गणेश माने, निलेश देठे, नसीम बेग, मोहन बाभुळकर, सरस्वती जाधव, गजानन पवने, सुनिल सोळंके, एस.टी. सोनुने, साहेबराव चव्हाण,  शेख सत्तार कुरेशी, सरदार पठाण, गोपाळ माळोदे, भिकन माळी, कादिरुद्दीन आदीरुद्दीन, रियाज मिर्झा, दिगांबर जाधव, राजाभाऊ गवते, अनिल माळी, गणेश गायकवाड, सुधाकर भारकड, संदिप भुसारी आदी सहभागी होते.