तरूणाई फाऊंडेशनचे कार्य समाजासाठी आदर्श ः आशाताई झोरे
दे.माळी (प्रतिनिधी) । 10 - सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणार्या देऊळगांव माळी येथील तरूणाई फाउंडेशनचे सामाजिक कार्य हे समाजासाठी खरच अग्रेसर आहे. असे गौरवोत्गार जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्रीमती आशाताई झोरे यांनी देऊळगांव माळी येथे झालेल्या भव्य पालक मेळाव्यात काढले तसेच देऊळगांव माळी पॅटर्न जिल्हाभर राबविणार तशा सुचना बालविकास प्रकल्प अधिकार्यांना केल्या असेही त्यांनी सांगितले.
देऊळगांव माळी गावाचा विकास आणि प्रशासनाची भुमिका या विषयावर परिसंवाद आयोजित करूणत आला होता. यामध्ये तरूणाई फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार कैलास राऊत व संतोष भराड यांच्या वतिने अंगणवाडी क्र. 04 व 06 ला मान्यवरांच्या हस्ते स्वयंपाकासाठी गॅस सप्रेम भेट देण्यात आला. महापुरूषांच्या कार्यांची बालकांना जाणीव होण्यासाठी गावातील सहा अंगणवाड्यांना महापुरूषांची नावे देऊन नामांतर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशाताई झोरे या होत्या. तर सरपंच सौ.शुभांगीताई मगर, उपसरपंच विनोद फळके, डॉ.मोहरूत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुरडकर, मेहकर पो.स्टे.चे पोलीस उपनिरिक्षक विलास मुंढे विट जमादार क्यावळ, मंडळ अधिकारी सोळंके, एकात्मिक बालविकास योजनेचे प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर चेके, सपकाळ, सुपरवायझर सौ.चव्हाण, श्रीधर काळे, किसनराव बळी, विजय राजगुरू सर, मुख्या खिल्लारे, पो.पा.गजानन चाळंगे, सुपरवायझर गव्हाळे, हिवरकर, घंटे, वूषाली बळी, तसेच अंगणवाडी सेविका मनोरमा लोणकर, सिंधुबाई लोणकर, यशेदा इंगोेले, वाढे मगर बळी. तर मदतनिस यमुना राऊत, शारदा भराड, हेलगे शेलुकर सुरशे गिन्हे इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हजर होते. एकात्मिक बाल विकासाच्या सर्व अधिकार्यांनी देऊळगाव माळी चा पॅटर्न सर्व जिल्हाभर राबवला अशा सुचना सभापती आशाताई झोरे यांनी यावेळी दिल्या यावेळी विजय राजगुरू, डॉ.मोहरूत, किसनराव बळी यांनीसुध्दा स्वतःहुन अंगणवाड्यांना गैस संच देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तरूणाई फाउंडेशन चे अध्यक्ष कैलास राऊत यांनी केले. सुत्रसंचालन सचिव गजानन तुपकर यांनी केले. आभार प्रदर्शन हरिभाऊ गायकवाड यांनी केले? कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्ता नारायण बळी साहेब (अभियंता सार्वजनिक पाटबंधारे) नागोजी मगर (विज वितरण अभियंता), पो.पा.गजानन चाळगे, जयराम बकाल, प्रल्हाद भारूडकर, आवासखाँ पठाण, दिपक बळी, दत्ता राऊत, वैभव मगर, भारत भराड, इ.नी परिश्रम घेतले.