यामी करणार मराठी चित्रपटात काम
मुंबई : फेअर अँड लव्हली गर्ल आणि कन्नड, तेलगू, तमिळ, हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री यामी गौतमनेही मराठी चित्रपटात काम करायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामी याबद्दल सांगते, की इतक्या भाषांतील चित्रपटात काम केल्यावर मराठीतही काम करायची संधी मिळाल्यास नक्कीच करेन; फक्त तशी स्क्रिप्ट मिळायला हवी. आता यामीस मराठीतही पदार्पण करायची संधी क
धी मिळतेय आणि ही संधी कोण देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
धी मिळतेय आणि ही संधी कोण देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.