डान्स स्कूलसाठी मला जागा मिळावी आणि तो माझा अधिकार- हेमा मालिनी
मुंबई, 02 - भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी जमीन वादावर मी मागील 20 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. डान्स स्कूल सुरु करण्यासाठी मला जागा मिळावी आणि तो माझा अधिकार आहे, असे हेमामालिनी यांनी म्हटले आहे.
मला नाट्य विहार केंद्रासाठी जमीन देण्यात आली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. मी एक कलाकार आहे. नियमांतर्गतच मला मुंबईत जमीन मिळाली आहे. या नृत्य अकादमीमध्ये सर्वांना मोफत प्रवेश देणार, असेही हेमा मालिनी यांनी स्पष्ट केले आहे. अंधेरीतील ओशिवरा परिसरातील 2 हजार स्क्वेअर मीटर जागा राज्य सरकार हेमा मालिनींच्या नाट्य विहार केंद्राला फक्त 70 हजारात देणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भातली माहिती मागितली होती. त्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे ही जागा बागेसाठी आरक्षित आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीसाठी 1976च्या दर लावण्यात आला आहे. 35 रुपये
प्रती चौरस मीटर एवढा आकारण्यात आला आहे.