समाजासाठी संघटीतपणे कार्य करावे- प्रा.लोखंडे
अहमदनगर । प्रतिनिधी । 15 - जे येतील त्यांना घेऊन जे नाहीत त्यांना विस्वास देऊन त्यागी वृत्तीने समाज हिताची कामे करा आपापसातील मत भेद दूर ठेऊन संघटीत पाने कार्य करा संघटनेच्या माध्यमातून’ चळवळ उभी करत असताना कोणत्याही प्रकारच्या मतभेदाची भावना मनामध्ये ठेउणका एकसंघ राहून समाजाला एकजुटीचा नवा आदर्श घालून दया असे विचार प्रा.सुनील लोखंडे यांनी व्यक्त केले.
बारामती येथील गुनवडी येथे लहूजी शक्ती सेनेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा.लोखंडे बोलत होते त्यावेळी विचार मंचावर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हस्के (आण्णा) शेंडगे ,अमोल चव्हाण (ता.अध्यक्ष),जालिंदर घोडे,सरपंच संतोष गावडे,(ग्रामपंचायत सदस्य)संतोष भिसे आदि मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्यासह देशभरात लहूजी शक्ती सेनेचा बोलबाला होत आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू (भाऊ)कसबे हे मातंग समाजाला एकत्र करून समाजाला येशोशिखरावर नेण्याच्या यशस्वी प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कार्यात समाजातील सर्वच तरुण उतरले पाहिजे असे आव्हान प्रा.सुनील लोखंडे यांनी केले यावेळी गौरव घोडे,निलेश
जाधव,अमर सकट,आप्पा वायदंडे,नादु खरात केदार पाटोळे व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश जाधव यांनी केले तर आभार मा.सरपंच पोपटराव गावडे यांनी मानले.