केडगावची बससेवा अभिकर्त्यांकडून बंद?
अहमदनगर । प्रतिनिधी । 15 - गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली केडगावची बससेवा अभिकर्ता कंपनीने बंद केली आहे. शाहूनगर, केडगाव व अंबिकानगर सेवा परवडत नसल्याने तसेच रिक्षाचालकांची सततची अरेरावी, यामुळे ही सेवा बंद केल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले असले तरी सत्य काय हे अद्याप समजलेले नाही.
सुमारे 80 हजारांची लोकवस्ती असणारे केडगाव झपाट्याने विस्तारत आहे. रोजच्या दैनंदिन कामकाजासाठी शहरात येणार्यांची संख्या मोठी आहे. तसेच येथून शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात येणार्यांचीही संख्या मोठी आहे. असे असूनही केडगावमध्ये सुरू असणारी बससेवा बंद करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी प्रवासी भाडे कमी केले तसेच ते बस कर्मचार्यांना बसच्या थांब्यावरून त्रास देत असतात. यामुळे रिक्षाचालक व बस कर्मचारी यांच्यात सतत वाद होतात.