Breaking News

‘मेक इन इंडिया’आणि विकासाची परिभाषा

विदेशी गुतंवणूकदारांना महाराष्ट्रात आणि देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’च्या सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मुबंईत झाले. विदेशी गुतंपणूकदारांना आकर्षित करणे हा जरी या मोहिमेचा मुख्य उद्देश असला तरी त्यातून नेमके काय साध्य होणार हा महत्वाचा मुद्दा आहे.देशाची आर्थिक राजधानीत विदेशी गुतंवणूकदारंनी गुतंवणूक करावी यासाठी‘मेक इन इंडिया’च्या आकर्षक पोस्टर्स व बॅनर्सने मुंबईला नवे रूप आले आहे. स्वच्छता व सुशोभीकरणामुळे अख्खी मुंबई चकाचक झाली आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईचाच ‘मेक ओव्हर’ झाल्याचा अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत. हा झगमगाट आणि आपले हे मोठेपण नेमके किती लोकांच्या नशीबी आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. आजही देशातील मोठा वर्ग आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. ही वास्तवता असतांना आपण मेक इन इंडिया सारखे कार्यक्रम राबवून देशात विदेशी गुंतवणूक आणणयाचा प्रयत्न करत आहोत. पण त्या विदेशी गुंतवणूकीतून कोणाचा फायदा झाला, त्या विकासाची फळे कोणाला चाखायला मिळाली हा महत्वाच्या प्रश्‍नाकडे आपण सातत्याने नेहमी दुर्लक्ष करत आहोत.शेतकरी,कष्टकरी अजूनही मागास आहे,अनेक प्रकल्प आले. पंरतू त्यांचा विकास होण्याऐवजी अधोगतीच झाली.‘मेक इन इंडिया’चा मुख्य उद्देश देशी कंपन्यांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी सोयी-सुविधा आणि सहकार्य मिळावे हा असला,तरी  योजनेअंतर्गत विदेशी कंपन्यांना सुविधा व्हावी म्हणून अनेक प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना भारतात येऊन 
प्रकल्प सुरू करणे सहज शक्य होऊ शकेल. देशाला मॅन्युफॅक्चरींग पॉवरहाऊस बनवणे आणि जीडीपीमध्ये वाढ करणे हाही यामागील एक उद्देश आहे. त्यानुसार देशातील 25 सेक्टर्समध्ये रोजगार निर्मिती करण्याची आणि कौशल्य विकास करण्याची योजना आहे. ऑटोमोबाइल्स, केमिकल्स, आयटी, फार्मास्युटिकल्स,टेक्सटाइल्स, बंदरगाह, एव्हिएशन, लेदर, टूरिझम, हॉस्पिटॅलिटी, वेलनेस, रेल्वे, ऑटो पार्टस, डिजाइन मॅन्युफॅक्चरिंग, माइनिंग, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांत ही रोजगारनिर्मिती होणार आहे. ही झाली मेक इंडियाची बाजी,मात्र याच मेक इंडियात दुसरा भारत देखील राहतो.जो अनेक वर्षापासून विकासाची वाट पाहत आहे. परंतू आपल्याला त्याचे कसलेही सोयरसुतक नाही. औद्योगिक विकास झाला की, दकशाचा विकास होईल, या भ्रामक समजुतीत आपण आजही वावरत आहोत.आजही या देशातील बहूसंख्य समूदाय हा शेतकरी आहे, कष्टकरी,श्रमिक आहे.त्याच्यासाठी काय? हा आमच्यासमोर महत्वाचा प्रश्‍न आहे.त्यामुळे विदेशी गंगाजळी आणायचीच असेल तर ती या समूदायासाठी आणा,विकास करायचाच असेल तर हजारो वर्षापासून आजही ज्यांना विकास म्हणजे काय माहित नाही, त्यांच्यासाठी गंतवणूक करा तरच देशाचे दरडोई उत्पन्न वाढेल.तरच देशाचा सर्वांगिण विकास होईल. नाहीतर विकासाच्या नावाखालच्या या औद्योगीकरणातून भाडंवलदारीच बोकाळेल,त्यांनाच चांगले दिवस
येतील,आणि आमचा शेतकरी, कष्टकरी बांधव मात्र विकासाच्या प्रतिक्षेत कोसो दूर राहील.