Breaking News

प्रत्येत घरात अफजल नाही, तर हनुमंतप्पा जन्मास येईल

 पुणे (प्रतिनिधी)।   14 -  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेतर्फे जेएनयू मधील देशविरोधी घोषणाबाजीचा तसेच अफजल गुरु व याकुब मेमन सारख्या दहशतवाद्यांचा होत असलेल्या उदात्तीकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. 
हर घर से अफजल नाही हनुमंतप्पा पैदा होगा व अगर कश्मीर की आझादी तक, भारत की बर्बादी तक जंग रहेगी तो वो सुबह कभी नही होगी अशी भावना यावेळी अभाविप तर्फे व्यक्त कण्यात आली.जेएनयू मध्ये 2 दिवसांपूर्वी अफजल गुरुला फाशीला 3 वर्षे झाल्याच्या निमित्ताने एआयएसएफ, एआयएसए, एसएफआय, डीएसयू या संघटनांनी श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्यामध्ये तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा, कश्मीर की आझादी तक, भारत की बर्बादी तक जंग रहेगी, पाकिस्तान जिंदाबाद सारख्या घोषणा देण्यात आल्या होत्या. जेएनयू मध्ये अनेक निष्पाप भारतीयांची हत्या करणार्‍या दहशदवाद्यांच्या 
होत असलेल्या या उदात्तीकरणाला अभाविपने पूर्वीपासूनच विरोध केला होता.सामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून जेएनयू मध्ये शिकत असताना अशा प्रकारची देशविरोधी घोषणाबाजी करणे म्हणजे नमकहरामी होय.तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वेळीच अशा प्रकारच्या देशविरोधी प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी अभाविप चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष श्रीनिवास भिसे यांनी केली.एकीकडे अशा प्रकारची देशविरोधी घोषणाबाजी होत असताना दुसरीकडे 35 सेल्सियस तापमानात देशाचे रक्षण करत 
असताना झालेल्या हिमस्खलणामुळे लान्स नाईक हनुमंतप्पा तब्बल 6 दिवस 25 फूट बर्फाच्या ढिगार्‍याखाली मृत्यूशी झुंज देत असताना शहीद झाला, अशा वीरआत्म्याला अभाविप तर्फे यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.