सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास झाडझूड करण्याची शिक्षा!
मुंबई, प्रतिनिधी, दि. 08 - संसर्गजन्य रोगांचा झपाट्याने होणारा प्रसार लक्षात घेता राज्य सरकार सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालणारे विधेयक पुढील महिन्यात होणार्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार आहे.
या विधेयकात सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा थुंकल्यास 1,000 रुपये दंड आणि सार्वजनिक ठिकाणे किंवा सरकारी कार्यालयात एक दिवस साफसफाईची शिक्षा, तर दुसर्यांदा थुंकताना आढळून आल्यास 3,000 रुपये दंड आणि तीन दिवस साफसफाईच्या समाजसेवेच्या शिक्षेची तरतूद आहे. वारंवार असे करताना आढळल्यास 5,000 रुपये दंड आणि 5 दिवस समाजसेवेच्या शिक्षेची तरतूद आहे.
झाडू घेऊन करावी लागणार झाडझूड : दंड आकारणे पुरेसे नाही. त्यामुळे सरकारने समाजसेवेची शिक्षा अनिवार्य केली आहे. दोषींना झाडू देऊन सार्वजनिक ठिकाणे व कार्यालयांत झाडावे लागेल, असे आरोग्यमंत्री दीपक
सावंत म्हणाले.