Breaking News

डॉ. दाभोलकर-कॉ. पानसरे यांच्या स्मृतिदिनी श्रमिक मुक्ती दलाचा कोल्हापूरात मुक मोर्चा

सातारा, 14 - डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरात ’हा हल्ला आम्ही विसरणार नाही’ असे फलक घेऊन मूक फेरी काढणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
डॉ. पाटणकर म्हणाले, 16 फेब्रुवारीला कॉमे्रड गोंविद पानसरे यांचा त्यांच्या घरासमोर गोळ्या घालून खून करण्यात आला. त्याबद्दल आम्ही सर्वजण कॉमे्रड पानसरे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या घरासमोर जमणार आहोत. हा हल्ला आम्ही विसरणार नाही, असे फलक हातात घेऊन तेथूनच मूक फेरी निघेल. ही फेरी राजर्षी शाहू महाराज पुतळ्याजवळ येईल. येथे आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. तसेच 20 जानेवारी या डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉमे्रड पानसरे यांच्या स्मृतिदिनी आम्ही कोल्हापुरातील स्मशानभूमीत जाणार आहोत. तसेच अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली... हे गीत गायन दसरा चौकात सादर करणार आहोत. दोघांच्या खुनाचे मुख्य सूत्रधार आणि मारेकर्‍यांना कायद्यातील कडक शिक्षा होईपर्यंत गप्प बसणार नाही, अशी शपथ राजर्षी शाहू महाराज पुतळ्याजवळ आम्ही सर्वजण घेणार आहोत. यानंतर मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानात सभा होईल. या सभेत आगामी कोकणच्या दिशेने होणार्‍या कोंबिंग ऑपरेशनचा निर्णय होईल.