Breaking News

प्रियांकाचे मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण

मुंबई : बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरचं मराठीत पदार्पण करत आहे. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीत ती अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणून पाऊल टाकतेय.प्रियांका ‘वेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. तिची निर्मिती संस्था असलेल्या  ‘पर्पल पेबल पिक्चर्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होईल. नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त झाला. प्रियांकाने स्वतः याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. गणपतीच्या फोटोसमोर क्लॅपबोर्ड आणि चित्रपटाची स्क्रिप्ट असे छायाचित्र तिने ट्विट केले आहे.