Breaking News

टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी गेल इंडियाची रफ्तार; देशपातळीवर धावरत्नांचा शोध

नाशिक/प्रतिनिधी। 16 -  सन 2010 मध्ये टोकिओ (जपान) येथे होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेसाठी देशभरातून 100 मी., 200 मी. व 800 मीटर या क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी गेल इंडियन स्पोर्ट स्टार व नॅशनल युवा को.ऑ. सोसायटी यांचेवतीने ‘गेल रफ्तार’ ही एक अखिल भारतीय धावपटू शोध निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवड चाचणी प्रक्रिया ते ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यापर्यंतचा येणारा सर्व खर्च गेल इंडिया या भारत सरकारच्या कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारलेले आहे. नॅशनल युवा को. ऑ. सोसायटी या सहकारी संस्थेच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. तसेच अंगलियन मेडल हंट कंपनी ही संस्था या निवड प्रक्रियेसंबंधीची संपूर्ण तांत्रिक बाजू सांभाळणार आहे.  वरील तिनही क्रीडा प्रकारात किंवा अतिदूर्गम भागातील ज्या होतकरू खेळाडूंकडे योग्यता आहे. असे सर्व खेळाडू किंवा जे खेळाडू जिल्हा/राज्य/राष्ट्रीय 
स्तरावर सहभागी झाले आहेत, परंतु ज्यांची निवड होऊ शकलेली नाही अशा सर्व 11 ते 17 वयोगटातील खेळाडू या निवड चाचणी प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. या खेळाडूंची जिल्हा/राज्य/राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी जे खेळाडू पात्र ठरतील अशा खेळाडूंसाठी स्पर्धेपूर्वी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येईल व नंतर त्या खेळाडूंची निवड चाचणी स्पर्धा घेऊन निवड समितीने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे ऑलिंपिक स्पर्धेसाठी या खेळाडूंमधून निवड करण्यात येईल.
राष्ट्रीय पातळीवरील निवड चाचणी स्पर्धेतून जे खेळाडू निवडले जातील अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू पी.टी.उषा, रचिता मिस्त्री, अनुराधा बिस्वाल आणि कविता राऊत यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येईल. या सर्व खेळाडूंना 2020 पर्यंत  पूर्ण प्रशिक्षण देऊन ऑलिंपीक स्पर्धेसाठीची त्यांची तयारी करून घेण्यात येईल. तसेच या खेळाडूंना भारतीय व परदेशी खेळाडूंचे मार्गदर्शन फिजिओथेरपी, आहार, मानसिक तंदुरूस्ती इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ज्या खेळाडूंना निवड चाचणी प्रक्रियेत सहभागी व्हावयाचे असेल अशा सर्व खेळाडूंनी स्पर्धेपूर्वी सहभागाबद्दलचा अर्ज भरणे आवश्ययक आहे. हे सर्व अर्ज ुुु.सरळश्रळपवळरीशिशवीीींंरी.ेीस या वेबसाईटवर उपलब्ध आहे. खेळाडू हे अर्ज ऑन लाईन देखील भरू शकतात किंवा सर्व शाळांच्या कार्यालयांमध्ये हे अर्ज उपलब्ध आहेत. खेळाडूंनी या अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला जोडणे आवश्यक आहे. या संदर्भात उपसंचालक, क्रीडा व युवक 
सेवा तसेच शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक काढले आहे.  महाराष्ट्र राज्यात ही जिल्हा पातळीवरील स्पर्धा अनुक्रमे नाशिक (18 फेब्रुवारी) जळगाव (20 फेब्रुवारी), मुंबई (22 फेब्रुवारी) धुळे व अहमदनगर (23 फेब्रुवारी) पुणे (24 फेब्रुवारी) या दिवशी आयोजित करण्यात येणार आहेत. निवड स्पर्धांच्या वरील तारखांपूर्वी दोन दिवस आधी खेळाडूंनी नोंदणी करणे आवश्यक आहे. राज्य निवड चाचणी स्पर्धा दिनांक 27 व 28 फेब्रुवारी 2016 रोजी बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खालील व्यक्तिंशी संपर्क साधावा.
राजेंद्र जगन्नाथ आढाव (नाशिक जिल्हा समन्वयक मो.9373903290 ीक्षरवर्हीं2015ऽीशवळषषारळश्र.लेा) अनिल एन.वाघ (नाशिक जिल्हा समन्वयक मो.9822799488 ुरसहरपळश्र713ऽसारळश्र.लेा) मंगेश बेडखळे (समन्वयक महाराष्ट्र राज्य मो.09890590083, स्पर्धेसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणए आहे. 11 ते 14 (ज.ता.1 जानेवारी 2002 ते 31 डिसेंबर 2004) 15 ते 17 (ज.ता. 1 जानेवारी 1999 ते 31 डिसेंबर 2001)स्पर्धेचे ठिकाण - स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी, औरंगाबाद नाका, पंचवटी, नाशिक, स्पर्धेचा दिनांक 18 फेब्रुवारी 2016 वेळ सकाळी 8 वाजता, प्रवेशाची अंतिम दिनांक 17 फेब्रुवारी 2016 असून शर्यत 100, 200 आणि 800 मीटर धावण्याची असेल. रजिस्टेशनसाठी मंगेश बेंडखले, 312, सुजाता मस्तानीच्या शेजारी, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड, पुणे-411059 यांचेशी संपर्क साधावा असे 
आवाहन करण्यात आले आहे.