Breaking News

सुंगधी परिवारातर्फे मंदिरासाठी दीड लाखाची मदत

 अहमदनगर । प्रतिनिधी । 14 - नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिराची सध्या गर्भगृहाच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यास होणारा खर्च पाहता शहरातील अनेक दानशूर व्यक्ती जीर्णोध्दारासाठी मदत करत आहेत. गणेश जयंतीचे औचित्य साधून सुंगधी परिवाराने गर्भगृहाच्या जीर्णोध्दारासाठी 1 लाख 51 हजार रुपयांचा निधी दिला तसेच अजुनही निधीची आवश्यकता असल्याने यासाठी दानशूरांची मदत करण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.
याप्रसंगी स्टेशन रोड भागातील राजेंद्र गुरुलिंग सुंगधी यांनी 1 लाख तर त्यांच्या मातोश्री श्रीमती   निर्मला सुंगधी यांनी 51 हजार रुपयांचा निधी श्री गणेश   मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्याकडे  सुपुर्द केला. याप्रसंगी सुरेश  खरपुडे, वैशाली सुंगधी, राजश्री  चिंचोरे,   साक्षी सुंगधी, देवस्थानचे संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष   पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त विजय कोंथिबीरे, हरिश्‍चंद्र गिरमे, रंगनाथ फुलसौंदर, शरद कोके,  पुर्वा सुंगधी, दुर्वा सुंगधी आदींसह  देवस्थानचे विश्‍वस्त उपस्थित होते.
यावेळी   सुंगधी म्हणाल्या की, अनेक   दिवसांपासून श्री विशाल   गणेश    मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु असल्याचे पाहत होतो. या मंदिराच्या   कामात आपलाही सहभाग   असावा,   या   उद्देशाने फुल ना   फलाची पाकळी म्हणून ही रक्कम गर्भगृहाच्या जीर्णोध्दारासाठी देत आहे.