Breaking News

प्रामाणिकपणाला कष्टाची जोड मिळाल्यास यश निश्‍चित : नागवडे

 श्रीगोंदा । प्रतिनिधी । 14 -  ग्रामीण भागातील तरुणांमध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याची कमालीची क्षमता असून त्याला योग्य मार्गदर्शन व प्रामाणिक कष्टाची जोड मिळाल्यास यश निश्‍चित मिळतेच असा विश्‍वास माजी आमदार व महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नारायणराव 
नागवडे यांनी व्यक्त केला.तालुक्यातील सोनिया गांधी पोलिटेक्निक ने आयोजित केलेल्या  माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश काँग्रेस च्या सरचिटणीस सौ. अनुराधा ताई नागवडे व जीकेएन सिंटर मेटल्स चे मनुष्य बळ विभागाचे अधिकारी  श्री. संग्राम कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी इस्रो व डीआरडीओ या नामवंत संशोधन संस्थान मध्ये कार्यरत महेश जांभळे व निलेश बनकर या माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 
अध्यक्ष स्थानावरून बोलताना नागवडे यांनी ग्रामीण भागात तंत्र शिक्षणाची गरज ओळखून  ऐंशी च्या दशकात धाडसी पाऊल टाकल्याचे सांगितले. 
त्यानंतर तंत्र शिक्षणाचे महत्व आता समाजाला पटू लागल्याने नैसर्गिक अप्पातींवर मात  करताना तंत्रशिक्षण एक आधार म्हणून समाजाला उमजू लागल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  संग्राम कदम यांनी औद्योगीक क्षेत्रात सध्या असलेल्या संधी व भविष्यातील आव्हाने यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या आव्हानांना सामोरे जाताना  आवश्यक अश्या पूर्वतयारीचा हि कानमंत्र विद्यार्थ्यांना यावेळी कदम यांनी दिला. ग्रामीण भागातील तरुणांनी न्यूनगंड व इंग्रजी ची भीती सोडण्याचा सल्ला या वेळी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सोनिया गांधी पोलिटेक्निक चे  प्राचार्य मगर व्ही. बी. यांनी संस्थेची वाटचाल सांगताना माजी विद्यार्थ्यांचा औद्योगीकरणात वाढलेला सहभाग व संस्थेच्या प्रगती मध्ये 
माजी विद्यार्थ्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमासाठी संथेचे निरीक्ष एस.पी. गोलांडे , संस्थेचे सदस्य भापकर सर, अशोकराव आळेकर, शिवाजीराव शेळके, माजी सरपंच देवराव वाकडे, भाऊसाहेब गोरे, माजी विद्यार्थी  व इतर मान्यवर मोठ्या संख्येने  उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. गायकवाड, प्रा. काळे, प्रा. इधाटे , प्रा. शिंदे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन हिरणवाळे यांनी केले.