मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज
सांगली, 15 - मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजनेचे प्रलंबित असलेले अर्ज महाविद्यालयांनी ऑनलाईन व हार्ड कॉपीसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली यांचे कार्यालयाकडे 18 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
मागास वर्ग विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविल्या जाणार्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क योजनेसाठी सन 2015-16 या वर्षी सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 28 हजार 62 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. यापैकी 18 हजार 89 विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप महाविद्यालयांच्या स्तरावर प्रलंबित आहेत. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी अल्प कालावधी शिङ्घक असल्याने सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाविद्यालयांनी सर्व अर्ज विहीत मुदतीत सादर करावेत.
महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेले अर्ज विहीत मुदतीत सादर न केल्यास जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचे आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरण्यात येईल. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम 2015 मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. कवले यांनी केले आहे.