Breaking News

इशरत जहाँबद्दल मला अभ्यास करावा लागेल: जितेंद्र आव्हाड

मुंबई, प्रतिनिधी, दि. 13 - डेव्हिड हेडलीनं इशरत जहाँ ही एक सुसाईड बॉम्बर होती. अशी कबुली दिल्यानंतर आजही आपण इशरतला निर्दोष मानता का? याबाबत बोलताना आव्हाड यांनी सावध पवित्रा घेत म्हणाले की, हेडली नेमकं काय म्हणाला हे मला अद्याप माहित नाही. त्याबाबत मला आधी जाणुन घ्यावं लागेल. पण इशरत जहाँ विषयी मला अभ्यास करावा लागेल.
हेडलीच्या कबुलीवरही आव्हाड यांनी संशय व्यक्त केला आहे. जेव्हा इशरत जहाँ चकमकीत मारली गेली त्यावेळी हेडली ड्रग्स तस्कर होता. तोवर त्याचा लष्करशी संबंध नव्हता. म्हणूनच त्यांनं इशरतबद्दल दिलेली माहिती कितपत खरी आहे हे पाहावं लागेल. तसंच तो त्यावेळी अमेरिकेसाठीही हेरगिरी करीत होता. त्यामुळे हेडलीचा वादग्रस्त इतिहास पाहता या गोष्टीवर कितपत विश्‍वास ठेवायचा हे ठरवावं लागेल. असंही आव्हाड म्हणाले.यापूर्वी डेव्हिड हेडलीने इशरत जहाँशी संबंधित गुजरात पोलिसांच्या दाव्याला दुजोरा दिला होता. डेव्हिड हेडलीने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) चौकशीदरम्यान सांगितलं होतं की, अहमदाबादमध्ये चकमकीत मृत्यू झालेली इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची सुसाईड बॉम्बर होती.राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि कायदा विभागाच्या चार सदस्यीय टीमसमोर अमेरिकेच्या शिकागोमध्ये तपासादरम्यान हेडलीने ही खळबळजनक माहिती दिली होती. इशरत जहाँच्या चकमकीवरुन देशभरात मोठं वादळ उठलं होतं. इशरत लष्कर-ए-तोयबाची सुसाईड बॉम्बर होती, असं गुजरात पोलिसांनी म्हटलं होतं.
इशरत जहाँ प्रकरणी आमदार अनिल गोटेंच मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आमदार अनिल गोटे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहलं होतो. इशरत जहाँ प्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या चौकशीचीही मागणी केली होती. तसंच इशरत जहाँच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केल्याच्या कारणांचा तपास करण आवश्यक असल्याचं गोटे यांचं म्हणणं होतं. 26/11 आरोपी डेव्हिड हेडली याच्या कबुली जबाबानुसार इशरत जहाँ मानवी बॉम्ब होती आणि तिला पंतप्रधान मोदींना मारण्याची कामगिरी सोपवली होती. असाही या पत्रात उल्लेख होता.