राहुल गांधी, केजरीवालसह अनेक नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
नवी दिल्ली, 29 - हैदराबादमधील सरुर नगर पोलीस ठाण्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सीताराम येचुरी, केसी त्यागी, आनंद शर्मा, डी. राजा यांच्यासह उमर खालिद आणि कन्हैया कुमार यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयूमधील घोषणाबाजी यानंतर हे प्रकरण जास्तच चिघळलं. संसदेत याच मुद्द्यांवर जोरदार चर्चाही झाली. सध्या, देशविरोधी घोषणाबाजी देण्याचा आरोप असणारे जेएनयूतील विद्यार्थी उमर खालिद, अनिर्बान आणि कन्हैया कुमार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या या तिघांची चौकशी सुरु आहे. जनार्दन गौड नामक एका व्यक्तीने मागील आठवड्यात सरुर नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. की, यांनी देशद्रोह केला असून यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा. जेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला त्यावेळी जनार्दन गौड यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर एल बी नगर कोर्टानं कलम 156 (3) च्या अतंर्गत पोलिसांना गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलमानुसार 124, 124 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.