Breaking News

अभिनेते राजेश खन्ना यांचा बंगला जमीनदोस्त!

मुंबई, 29 - सुपरस्टार अभिनेते राजेश खन्ना यांचा प्रसिद्ध ‘आशीर्वाद’ बंगला जमीनदोस्त झाला आहे. मुंबईतील बांद्रास्थित ‘आशीर्वाद’ बंगला खरेदी केलेल्या मालकाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून पाडकाम सुरु होते. बांद्र्यामधील कार्टर रोडवर हा बंगला आहे. 
अभिनेते राजेश खन्ना यांचे 2012 साली निधन झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हा बंगला ऑलकार्गो लॉजिस्टिक्सचे संस्थापक आणि अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांना सुमारे 90 कोटी रुपयांना विकला. सूत्रांच्या माहितीनुसार, शशी किरण शेट्टी यांनी ‘आशीर्वाद’ बंगल्याच्या ठिकाणी चार मजली अलिशान बंगला बांधण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: शेट्टी हे या नव्या बंगल्यात आपल्या नातेवाईकांसह राहणार आहेत. राजेश खन्ना यांनी हा बंगला 1990 च्या दशकता प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांच्याकडून खरेदी केला होता.