Breaking News

कृषि यांत्रीकीकरण उपअभियान अंतर्गत अनुदानावर औजार पुरवठा

नाशिक/प्रतिनिधी। 14 -  राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलीत औजारे,पॉवर टिलर,स्वयंचलित औजारे,मनुष्यचलित औजारे,पिक संरक्षण उपकरणे, मनुष्यचलीत औजारे व पॉवर ऑपरेटेड पीक संरक्षण उपकरणांचा अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे.  
सदर योजनेतंर्गत ट्रॅक्टर पुरवठ्यासाठी अ.जा.,अ.ज, महिला व अल्प भूधारक यांना 35 टक्के मर्यादेत व जास्तीत जास्त रक्कम रु. 1.25 लाख व इतर लाभार्थी करीता 25 टक्के मर्यादेत व जास्तीत जास्त रक्कम रु. 1.00 लाख प्रती ट्रॅक्टर एवढी अनुदान मर्यादा आहे. स्वयंचलित व ट्रॅक्टरचलीत औजारांसाठी किँमतीच्या जास्तीत जास्त 50 टक्के अनुदान मर्यादा आहे. तसेच कृषि औजाराच्या  रु.10 लाख भांडवली गुंतवणुकीवर 40 टक्के अनुदानाची मर्यादा असणार आहे.  
सदर योजनेच्या लाभासाठी प्रथम प्राधान्य तत्वावर आधारित लाभार्थींची यादी तयार जिल्हास्तरीय कार्यकारी समितीकडून तयार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने मान्यता दिल्यानंतर ट्रॅक्टर व औजारांचा पुरवठा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,नाशिक यांचेशी संपर्क साधावा.