ईडीचे भुजबळांच्या मालमत्तेवर पुन्हा छापेमारी
मुंबई, 01 - अंमलबजावणी संचालनालय ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात 9 मालमत्तांवर छापेमारी केली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली.छगन भुजबळ य ांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्याही मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे.
त्यामुळे छगन, समीर आणि पंकज भुजबळ यांनी आता कुठल्या जेलमध्ये जायचे हे ठरवायला हवे, असा टोला सोमय्यांनी लगावला. भुजबळ गटातीलच काही लोक आमच्यासेबत आले आहेत, ते एसीबी ला माहिती देत आहेत. भुजबळ कुटुंबियांच्या नावाने 63 बोगस बँक अकाउंट उघडण्यात
आले आहेत.